नवी दिल्ली : दिल्लीच्या जंतर-मंतरवर आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना दिल्लीपोलिसांनी ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांना सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आलं. याच दरम्यान कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दिपके यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. माझं हे आमरण उपोषण अनिश्चित काळासाठी आहे असे म्हटलं आहे. उपोषणामुळे सोनम वांगचुक यांच्या प्रकृती आणखी बिघडू शकते, असं कारण देत पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र कॉकरोच जनता पार्टीशी संबंधित लोकांनी, पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना तिथून हटवल्याचा आरोप केला आहे.
मी आजपासून माझं आमरण उपोषण सुरू करत आहे. २० जुलै रोजी आमचा मोर्चा देखील निघेल आणि माझं उपोषणही सुरूच राहील. सोनम सरांना आत टाकून किंवा इथून हटवून हे आंदोलन संपवता येईल, असं या लोकांना वाटत आहे. पण हे आंदोलन संपणार नाही. सोनम सरांना फरफटत नेण्यात आलं आहे. शिवीगाळ करणं आणि त्यांना इथून घेऊन जाणं हे अत्यंत चुकीचं कृत्य आहे, याने आंदोलन संपणार नाही. हे आंदोलन सुरूच राहील. आम्ही इथेच थांबणार आहोत. आता २० तारखेला इथूनच संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात येईल असं अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.
मला मारहाण केली, रस्त्यावरुन फरफटत नेले
पोलिसांनी गुंडांसारखं वर्तन केलं आहे. ज्या लोकांना दिल्लीत यायचं आहे, त्यांनी यावं. आम्ही इथेच बसून राहणार आहोत. दिल्ली पोलिसांनी मलाही मारहाण केली आणि जंतर-मंतरवर जाण्यापासून रोखलं. मला मारहाण करण्यात आली, रस्त्यावरुन फरफटत नेलं आणि म्हणाले, बघूया तू जंतर-मंतरवर कसा जातोस? इथे अनेक आमदार आणि खासदार आहेत, ज्यांना गेटवरच रोखण्यात आलं असून आत जाऊ दिलं जात नाहीङ्घङ्घ असं देखील अभिजीत दिपके यांनी सांगितलं.
सरकारी कामात अडथळा आणू नये
अभिजीत दिपके यांच्या आरोपांना दिल्लीचे डीसीपी सचिन शर्मा यांनी उत्तर दिलं आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि प्रकृतीची स्थिती तसेच वैद्यकीय सल्ल्याच्या आधारे आम्ही हा निर्णय घेतला आहे. सोनम वांगचुक यांना अत्यंत आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं असून ते सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत असं सचिन शर्मा यांनी म्हटलं आहे. तसेच सरकारी कामात अडथळा आणू नये आणि अधिकार्यांना सहकार्य करावं असं पोलिसांनी लोकांना आवाहन केलं आहे. दिल्लीचे डेप्युटी कमिशनर सचिन शर्मा यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत. रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीर्घ उपोषण आणि शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे वांगचुक अशक्त झाले आहेत.
माझ्या संमतीशिवाय कोणतंही औषध देऊ नका
दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वांगचुक यांच्या पत्नीने ङ्गङ्घमाझ्या संमतीशिवाय कोणतंही औषध देऊ नकाङ्घङ्घ असं म्हणत रुग्णालयाला अल्टिमेटम दिला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे अंग्मो यांनी ट्वीट केलं आहे. मी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात आहे, जिथे सोनम वांगचुक यांना दाखल करण्यात आलं आहे. माझी, त्यांच्या कुटुंबीयांची आणि गेल्या २० दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असलेल्या डॉक्टरांची संमती घेतल्याशिवाय त्यांना तोंडावाटे किंवा कोणतंही औषध किंवा उपचार दिले जाऊ नयेत असं गीतांजली जे अंग्मो यांनी म्हटले आहे.